zp bharti velapatrak : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १९ हजार ४६० पदे भरल्या जात आहेत. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
सर्व ठिकाणी एकाच कालावधीत पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार. म्हणून एकाच पदासाठी जास्त जिल्हा परिषदेत अर्ज करू नये. शुल्काचा नाहक खर्च होणार. प्रवेशपत्र हे संगणीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेशपत्रनुसार उमेदवारास एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षा क्रमांक आल्यावर त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद जाहिरात – ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
तपशील दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक ०५/०८/२०२३
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २५/०८/२०२३
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत २५/०८/२०२३
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी ७ दिवस
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✔️अर्ज करण्यासाठी लिंक ओपन होत नसल्यास मोबाईल मध्ये डेस्कटॉप मोड ओपन करावा आणि मोबाईल रोटेट करावा किंवा कम्प्युटरचा वापर करावा.
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा➡️
अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची सुचना –
अ) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये, जेणेकरून अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होणार नाही.
ब) भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास ही जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू. १०००/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू.९००/-
अनाथ उमेदवारांसाठी रू.९००/-
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.
परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची (पावती) प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.