Tar Kumpan Yojana : मित्रांनो, आपले शेतकरी बांधव रात्रंदिवस राबून अतिशय कष्टाने शेती करतात,आणि परंतु जेव्हा त्याच्या कष्टाचा फळ घ्यायची वेळ येते तेव्हा काही जंगले आणि पाळीव प्राणी तसेच इतरही वन्यजीव शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत करतात त्यामुळे त्याची इतक्या दिवसाची मेहनत वाया जाते. परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वायर फेसिंग सबसिडी स्कीम या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळू शकतात.या योजने अंतर्गत शेतीसाठी काटेरी कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देखील दिले जाते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा? या लेखात आपण दिवसाची माहिती व योजनेचा उद्देश, यासाठी अर्ज कसा करावा? योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ई. विषय अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊ. Tar Kumpan Yojana
सुरुवातीला आपण या योजनेविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया
जसे की आपणाला माहितीच आहे की शेतपिकाचे वन्यजीवांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प योजने अंतर्गत शेतीला काटेरी कुंपण करून घेता येते. यामध्ये शेतकऱ्याला कुंपण करण्यासाठी 90% पर्यंत अनुदान देखील देण्यात येते. ज्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने फारच सोयीस्कर आणि लाभदायी आहे.
योजनेचा मुख्य उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी बांधव आपल्या शेताला तर कुंपण करून कष्टाने पिकवलेल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. तार कुंपण करून वन्यपणापासून संरक्षण मिळवल्याने शेतकरी शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. यामधून विकासाला चालना मिळून उत्पादकता आणि पर्यायी रोजगार संधी वाढतील. या योजनेमुळे वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळता येईल आणि मनुष्य आणि वन्यजीव यांचे जीवन वाचवता येईल.