ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय

 

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली. महिलांना तर अर्ध्या तिकीटात प्रवास सुरु केला परंतू आता या कॅटगरीच्या लोकांनी ही सवलत बंद झाली आहे.

 

ST Bus News एसटीच्या ( MSRTC ) गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो. त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो. आता एसटीने अलिकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ( Senior citizen ) संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनणायला वेळ लागणार नाही. परंतू आता एसटी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे. एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते पाहूयात…

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मूभा दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते. याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते. आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

 

ST Bus News आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रक अनूसार एसटीतून सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती. आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) शि.मं.जगताप यांनी दिले आहेत.

 

 

 

 

एस टी महामंडळाचा नवीन निर्णय.!आता या नागरिकांना मिळणार नाही बस मध्ये मोफत प्रवास

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा. एस. टी. महामंडळाने ६५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे. तर वयाची ७५ पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. मात्र, अनेक प्रवासी वय वाढविलेले खोटे आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेतात. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांना ओरिजनल आधार कार्डच वाहकांना दाखविणे गरजेचे असून, संबंधित लाभार्थी प्रवाशांकडे डुप्लिकेट आधार कार्ड आढळून आले, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना रितसर तिकीट काढून प्रवास करावा लागेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाने पाच वर्षांपासून स्मार्ट कार्डची योजना सुरू केली आहे. प्रत्येक सवलत घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रवासात कार्ड काढणे बंधनकारक केले होते. त्यानुसार अनेकांनी हे कार्ड काढले. मात्र, स्मार्ट कार्ड काढण्याचे काम दिलेल्या कंपनीच्या तांत्रिक कारणामुळे या कार्डची नोंदणी सुमारे एक ते दीड वर्षापासून बंद झालेली आहे.

महिलांना अर्धे तिकीट

एसटी महामंडळाने राज्यभरातील

एसटीमध्ये कोणकोणत्या सवलती?

मुलींना व महिलांना प्रवासात ५० टक्के सरसकट तिकीट सवलत लागू केली आहे. या सुविधेचा लाखो महिला लाभ घेत आहेत.

ज्येष्ठांना अर्धे तिकीट :

ज्या नागरिकांचे वय ६५ च्या पुढे आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत लागू केली आहे.

७५ पेक्षा जास्त

वयोगटाला मोफत प्रवास :

देशाच्या अमृत महोत्सव अंतर्गत एस. टी. महामंडळाने वयाचे ७५ पूर्ण केलेल्यांना मोफत प्रवास ही योजना लागू केली आहे.

ओरिजनल आधार कार्डच हवे

ज्येष्ठ नागरिकांना तिकीट प्रवासात सवलतीचा लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे करण्यात आले आहे. डुप्लिकेट आधार कार्ड, आढळून आल्यास वाहक अशा प्रवाशांकडून तिकीट आकारण्यात येते.

ज्येष्ठ नागरिकांना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

महामंडळाने ओरिजनल आधार कार्ड सोबत ठेवण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. संबंधित लाभार्थी प्रवाशांना

आढळून आल्यास पूर्ण तिकीटाचा भुर्दंड हा प्रवाशाला बसेल.

Leave a Comment