ssc recruitment 2023 : तुम्हाला जर उत्तम भाषांतर करता येत असेल तर केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये भाषांतरकार म्हणजेच ट्रान्सलेटर पदासाठी खास भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ३०७ रिक्त जागा भरण्यात येणार असून त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..
केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये (एसएससी- staff selection commission) मध्ये मोठी भरती सुरु आहे. पदव्युत्तर पदवी धारकांसाठी सरकारी नोकरीची ही महत्वाची संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने याबाबत नुकतीच अधिसूचना जाहीर केली असून या अंतर्गत ट्रान्सलेटर पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्जाची पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
स्टाफ सिलेक्शन कमिशनने पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत, विभागात, विविध संस्थामध्ये, कार्यालयामध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर या ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली आहे. या अंतर्गत ३०७ ट्रान्सलेटरची पदे भरली जाणार असून नुकतेच या परीक्षेचे तपशील समोर आले आहेत.
‘ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२३’, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांचे तपशील पुढीलप्रमाणे:
SSC Recruitment 2023 For Translator: तुम्हाला जर उत्तम भाषांतर करता येत असेल तर केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये भाषांतरकार म्हणजेच ट्रान्सलेटर पदासाठी खास भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ३०७ रिक्त जागा भरण्यात येणार असून त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..
SSC Recruitment for translator post
केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये (एसएससी- staff selection commission) मध्ये मोठी भरती सुरु आहे. पदव्युत्तर पदवी धारकांसाठी सरकारी नोकरीची ही महत्वाची संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने याबाबत नुकतीच अधिसूचना जाहीर केली असून या अंतर्गत ट्रान्सलेटर पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे.
रु. 28,990/- पासून तज्ञांनी शिफारस केलेले टॉप रेटेड स्मार्टचॉइस लॅपटॉप मिळवा |
स्टाफ सिलेक्शन कमिशनने पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत, विभागात, विविध संस्थामध्ये, कार्यालयामध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर या ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली आहे. या अंतर्गत ३०७ ट्रान्सलेटरची पदे भरली जाणार असून नुकतेच या परीक्षेचे तपशील समोर आले आहेत.
‘ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२३’, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांचे तपशील पुढीलप्रमाणे:
पदे आणि केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयात/ कार्यालयात रुजू होणार…
ज्युनियर ट्रान्सलेटर – सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सव्र्हिस (CSOLS)
ज्युनियर ट्रान्सलेटर -रेल्वे बोर्ड
ज्युनियर ट्रान्सलेटर आम्र्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स (AFHQ)
ज्युनियर ट्रान्सलेटर/ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर – केंद्र सरकारचे सबऑर्डिनेट ऑफिस
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर – केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/ कार्यालये
एकूण पदे – ३०७
वेतन:
ज्युनियर ट्रान्सलेटर/ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदांसाठी पे-लेव्हल -६ अंदाजे वेतन दरमहा ६५ हजार रुपये. तर सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी पे-लेव्हल- ७ अंदाजे वेतन दरमहा ८१ हजार रुपये.
पात्रता:
या भरती प्रक्रियेतील सर्व पदांसाठी हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक तसेच पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.
किंवा
हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही अन्य विषयातील हिंदी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.
किंवा
हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील इंग्रजी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम हिंदी असावे.
आणि हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशनचा केंद्र/राज्य सरकारचे ऑफिस/पब्लिक सेक्टर अंडरटेकींगमधील २ वर्षांचा अनुभव. सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
निवड पद्धती:
ऑक्टोबर २०२३ मध्ये संगणक आधारित, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची पहिली परीक्षा होईल. या परीक्षेच्या गुणवत्तेनुसार सऱ्या परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातील. दुसरी परीक्षा ही ट्रान्सलेशन, निबंध लेखन अशा पद्धतीची असेल. दोन्ही परीक्षेच्या निकषांवर कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवार निवडले जातील. अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी कमिशनच्या वेबसाईटवर उमेदवारांना विविध पदांसाठी ऑनलाइन ऑप्शन- पदनिहाय पसंतीक्रम भरून द्यावा लागेल त्यानंतर अंतिम भरती होईल. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागाचा (वेस्टर्न रिजन) संकेतस्थळा http://www.sscwr.net वरून अॅडमिशन सर्टिफिकेट डाऊनलोड करून प्रिंट्रआऊट काढता येतील.
परीक्षा केंद्र:
अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ. ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यपद्धती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III/ Annexure- IV मध्ये दिलेली आहे.
ऑनलाइन अर्ज https:// http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर १२ सप्टेंबर २०२३ रात्री ११ वाजेपर्यंत करता येतील.
या भरतीची सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी:
https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/FINAL_NOTICE_JHT_2023_22082023.pdf या लिंकला भेट द्या.