Portable Solar Power Generator:या जनरेटरचा आकार खूपच लहान असल्याने ते पिशवीतदेखील सहजपणे राहू शकते. वजनाने हलके असल्याने लहान मुलेही ते सहज उचलू शकतात.
Portable Solar Power Generator: पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर असे याचे नाव आहे. हा जनरेटर लहान बॅटरीच्या आकाराचा आहे. जो तुम्ही सहजपणे कुठेही ठेवू शकता. टीव्ही, लॅपटॉप यासारखी छोटी उपकरणे चालवण्यासाठी याचा वापर करता येतो. हे उपकरणअतिशय हलके आणि खूपच शक्तिशाली आहे.
लाईट गेली तरी चालेल टीव्ही-पंखा, बॅगमध्ये कुठेही घेऊन फिरा ‘हे’ छोटे डिव्हाइस
Portable Solar Power Generator: आपल्याकडे अनेक ठिकाणी पूर्णवेळ लाईट नसते. गावाकडे गेल्यावर, ट्रेकला गेल्यावर आपल्याला वीजेचे महत्व कळते. पावसाळ्यात वीज खंडित होण्याची समस्या खूप असते.
विजेच्या तारा खराब होऊन अचानक घराची वीज बंद होते. यानंतर घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद होतात. ना टीव्ही चालतो, ना फ्रीज चालतो आणि पंखेही थांबतात. या सर्व उपकरणांवर आपण खूपच अवलंबून असतो.
वीज नसेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हीदेखील कधी या त्रासातून गेला असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आज आपण पोर्टेबल सोलर जनरेटरबद्दल माहिती करुन घेणार आहोत. त्यामुळे तुमच्या घरची वीज गेली किंवा कोणते इलेक्ट्रिक उपकरण चालत नसेल तर हे उपकरण तुमच्या उपयोगी येणार आहे.
पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर असे याचे नाव आहे. हा जनरेटर लहान बॅटरीच्या आकाराचा आहे. जो तुम्ही सहजपणे कुठेही ठेवू शकता. टीव्ही, लॅपटॉप यासारखी छोटी उपकरणे चालवण्यासाठी याचा वापर करता येतो. हे उपकरणअतिशय हलके आणि खूपच शक्तिशाली आहे.
हा जनरेटर अत्यंत शक्तिशाली आहे आणि त्याची क्षमता 42000mAh आणि 155Wh आहे. याद्वारे तुम्ही आयफोन 8 सुमारे 8 वेळा चार्ज करू शकता.
LED बल्ब 25 तास जळू शकतो, 2 तासांपेक्षा जास्त वेळ टेबल फॅन चालवू शकतो. याचे वजन 1.89KG आहे आणि ते डिझाइनमध्ये अतिशय कॉम्पॅक्ट आहे.
हे सौर पॅनेल (14V-22V / 3A कमाल) सह सूर्यकिरणांद्वारे चार्ज केले जाऊ शकते. सोलर एनर्जी जनरेटर फक्त रु.19,000 मध्ये मिळू शकते. याच्या कामाच्या तुलनेत किंमत खूपच कमी मानली जात आहे.
या जनरेटरचा आकार खूपच लहान असल्याने ते पिशवीतदेखील सहजपणे राहू शकते. वजनाने हलके असल्याने लहान मुलेही ते सहज उचलू शकतात.