petrol price in maharashtra now दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. मंगळवारी जाहीर केलेल्या दरांमध्ये अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता या तिन्ही शहरांमधील नागरिकांना दिलासा कायम आहे. या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र चेन्नईत पेट्रोल १४ पैशांनी महागलं आहे. (Latest Petrol Price In Pune Today)
कच्च्या तेलाच्या किंमती किती?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. WTI क्रूड ऑइल आज 0.04 टक्क्यांनी घसरलं असून प्रति बॅरल ८०.०७ प्रति बॅरल आहे. ब्रेंट क्रूड ऑइल ०.०४ टक्क्यांनी कमी झालं असून प्रति बॅरल ८४.३९ प्रति बॅरलने विकलं जात आहे.
पुणेकरांना मोठा दिलासा
आज पुण्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. शहरात पेट्रोल ९४ पैशांनी स्वस्त झालं असून १०५.९१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३ पैशांनी स्वस्त होऊन ९२.४३ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. गुरुग्राममध्येही पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त झालं आहे. ९६.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १३ पैशांनी स्वस्त होऊन ८९.७२ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. अजमेरमध्ये पेट्रोल ४८ पैशांनी स्वस्त झालं असून १०८.२० रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ४३ रुपयांनी स्वस्त झालं असून ९३.४७ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
चार प्रमुख महानगरांमधील दर किती?
दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त होऊन १०२.७७ रुपये, डिझेल १३ पैशांनी स्वस्त होऊन ९४.३७ रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.
तुमच्या शहराचे इंधन दर असे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.