Paid leave for government employees : केंद्र सरकारने अखिल भारतीय सेवेच्या (AIS) पात्र सदस्यांसाठीच्या सुट्यांबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत आता हे कर्मचारी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दोन वर्षांची पगारी रजा घेऊ शकतात. ही रजा दोन मुलांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त 2 वर्षांसाठी सरकारकडून दिली जाईल.
डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग (DoPT) ने अलीकडेच एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना 28 जुलै रोजी जारी करण्यात आली. या अंतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करून अखिल भारतीय सेवा मुलांची रजा नियम 1995 मध्ये सुधारणा केली आहे. AIS कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते.
2 मुलांची काळजी घेण्यासाठी 730 दिवसांची रजा
अखिल भारतीय सेवा (AIS) च्या महिला किंवा पुरुष सदस्याला दोन मुलांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण सेवेदरम्यान 730 दिवसांची सुट्टी दिली जाईल. पालकत्व, शिक्षण, आजारी आणि तत्सम काळजी या कारणास्तव मुलाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ही रजा दिली जाऊ शकते. चाइल्ड केअर लीव्ह अंतर्गत, कर्मचाऱ्याला संपूर्ण सेवेदरम्यान रजेच्या पहिल्या 365 दिवसांसाठी 100% पगार दिला जाईल. तर दुसऱ्या 365 दिवसांच्या रजेवर 80 टक्के पगार मिळणार आहे. अधिसूचनेनुसार, चिल्ड्रेन लीव्ह खाते इतर सुट्ट्यांमध्ये एकत्रीत केले जाणार नाही. या अंतर्गत, एक स्वतंत्र खाते असेल, जे कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे दिले जाईल.