‘या’ जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon : चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत राज्यासह देशभरात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चक्रीवादळ मिचॉन्गचा परिणाम देशातील तसेच राज्याच्या हवामानावर होणार आहे. 7 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल.

 

 

४८ तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस

 

पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आज पाऊस पडणार आहे. पुढील ४८ तासांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, लातूर परिसरात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

येल्लो अलर्ट मधील जिल्हे :- भंडारा चंद्रपूर गडचिरोली

विजांसह पावसाची शक्यता :- नांदेड हिंगोली परभणी नागपूर गोंदिया

Leave a Comment