मतदार यादी कशी पाहायची?
मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.
ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? यंदा होणार हे बदल….
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं?
या वेबसाईटवरील उजवीकडच्या Voter Service मधील Electoral Roll 2023 PDF या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल.
मतदान यादी जाहीर, यादीत नाव पहा…
त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
आणि मग कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.
त्यानंतर Open PDF यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते.
ग्रामपंचायत निवडणूक
फोटो स्रोत,CEO.MAHARASHTRA.GOV.IN
मतदार यादी-2023 असं या यादीचं शीर्षक असतं. इथं सुरुवातीला तुमचं गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती दिलेली असते.
पुढे मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते.
त्यानंतर गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असेत. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता.
उमेदवारांची कुंडली
आता वॉर्डनिहाय उमेदवार आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी तुम्हाला panchayatelection.maharashtra.gov.in असं टाईप करावं लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला Affidavit by the final contesting candidates या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
यानंतर Search Document नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला Local Bodyमधील पर्यायांपैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर Division मध्ये तुमचं गाव ज्या विभागात येतं तो विभाग निवडायचा आहे.
त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
त्यानंतर Election Programe Name या पर्यायासमोर आपल्याला Gram Panchayat General Election -2022 हा पर्याय निवडायचा आहे.
सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमचा वॉर्ड निवडायचा आहे. आता समजा मी वॉर्ड क्रमांक 1 निवडला, तर त्याखाली असलेल्या सर्च या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी All Final Contesting Candidate List या पर्यायासमोर तुम्हाला दिसेल.
इथं उमेदवाराचा नोंदणी क्रमांक, पूर्ण नाव, वॉर्डाचा नंबर, वॉर्डाचं नाव आणि डाऊनलोड हा पर्याय दिलेला असेल.
आता ज्या उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला पाहायचं आहे त्या उमेदवाराच्या नावासमोरील View Affidavit या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर उमेदवारानं उमेदवारी अर्जासोबत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र ओपन होईल.
या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यवसायाचा तपशील, मालमत्तेचा तपशील याची सविस्तर माहिती दिलेली असते.
सगळ्यात शेवटी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीचा सारांश असतो. जसं की वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची संख्या, नावावर गुन्हे आहे का, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, स्थावर, जंगम आणि एकूण मालमत्ता, तसंच काही कर्ज असल्यास तेसुद्धा नमूद केलेलं असतं.
अशापद्धतीनं तुम्ही तुमच्या वॉर्डमधील उमेदवारांची नावं आणि त्यांच्याविषयीचा तपशील इथं पाहू शकता.