१ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या बँक खात्यावर एक लाख मिळणार

mazi kanya bhagyashree scheme : माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे

मुलींचे जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे यासाठी सुकन्या योजना

दिनांक १ जानेवारी २०१४ पासून दारिद्रय रेषेखाली जन्मणा-या प्रत्येक मुलीसाठी कुटुंबातील २ अपत्यापर्यंत लागू करण्यात आली होती.

 

 

शासन निर्णय डाउनलोड – Download

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज डाउनलोड – Download

 

 

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे ,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे. mazi kanya bhagyashree scheme from government of maharashtra 2023

Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra
मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे.

सदर योजना दारीद्रय रेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणा-या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून

दारीद्रय रेषेवरील APL कुटुंबात जन्माला येणा-या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या दिनांक ७/१२/२०१५ च्या इतिवृत्तात योजनेसाठी आवश्यक निधीबाबत स्वतंत्र छाननी करुन मा.मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने निर्णय घेण्यात यावा असे नमुद केलेले आहे.

माझी कन्या भाग्यश्री हया योजनेमध्ये बदल करुन माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून लागु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे ,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे ,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाख (सात लाख पन्नास हजार फक्त ) पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात येत आहे.

लाभाचे निकष खालीलप्रमाणे रहातील. अ.क्र. लाभ मिळण्यास शासनाकडून बँकेत मुलीच्या वयाच्या टप्यानुसार द्यावयाची रक्कम पात्र लाभार्थी गुंतवणुक करण्यात.

योजनेच्या शर्ती/अटी खालीलप्रमाणे रहातील
सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी बँकेंसोबत आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवायोजना,नवी मुंबई हे करारनामा करतील.

बँकेसोबत मुदत ठेवीची कार्यपध्दती कशाप्रकारे राबविण्यात येईल याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील.

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यांनतरच्या मुलींना अनुज्ञेय राहील.

१ ऑगस्ट २०१७ पासून लागु करण्यात येत आहे. ज्या कुटुंबाना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पुर्वी १ मुलगी आहे व

दिनांक १ ऑगस्ट २०१७ नंतर दुस-या मुलीचा जन्म झाल्यास व माता/पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुस-या मुलीला रुपये २५,०००/- इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

majhi kanya bhagyashree yojana chi mahiti
पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.

कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तीला हा लाभ देय असेल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदेय नसेल.

तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक/दोन अपत्यांचे लाभही बंद होतील. तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम ९११ अतिप्रदानाची वसुली या
लेखाशिर्षातंर्गत जमा करण्यात येईल.

लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील १८ व्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे व इयत्ता १० वी परिक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील.

दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या मुली योजनेस पात्र असतील. बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील.

mazi kanya bhagyashree yojana eligibility
दत्तक पालकांनी मुलांचे अकाऊंट उघडुन हा लाभ त्या अकाऊंटला देण्यात येईल. मात्र दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी/शर्ती लागू रहातील.

सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल. विहित मुदतीपूर्वी (वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) मुलीचा विवाह झाल्यास, किंवा दहावी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा

दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नांवे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाचे नांवे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल.

मात्र नैसर्गिक कारणाने मुलीचा मुत्यु झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पुर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देय होईल.

प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल.

तसेच मुलीच्या नावे रक्कम बँकत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मुळ गुंतवणुक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यांस देण्यात यावी. व त्याची छायांकित प्रत शासकीय कार्यालयात जमा करुन ठेवण्यात यावी.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता
दिनांक १ जानेवारी २०१४ ते दिनांक ३१ मार्च २०१६ या कालावधीत सुकन्या योजना कार्यन्वीत होती.

तसेच दिनांक १ एप्रिल २०१६ ते दिनांक ३१ जुलै २०१७ या कालावधीत जुनी माझी कन्या भाग्यश्री ही योजना कार्यन्वीत होती.

सदर कालावधीत संबधित लाभार्थ्यांने अर्ज केला असेल व आजच्या निकषानुसार पात्र ठरत असेल तर त्यास या योजनेचा लाभ देय राहील.

मात्र दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये नमुद असलेले लाभ मंजूर करण्यात यावेत.

सदर योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थ अथवा अन्य अशासकीय व्यक्तींचा सहभाग असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाख पर्यंत असल्याचे स्थानिक तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतरचा योजनेचा लाभ देण्यात यावा.

मुलावर मिळणा-या व्याजाचा दर हा त्या त्यावेळी बँकेमार्फत लागु असलेल्या दरानुसार अनुज्ञेय राहील.

एका मुलीच्या जन्मानंतर माता /पित्याने १ वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन योजनेचा

लाभ मिळण्यासाठी संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण/नागरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

त्यांनतर सादर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही.

तसेच दोन मुलीनंतर ६ महिन्याच्या आत कुटुंबनियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणा-या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.
majhi kanya bhagyashree yojana documents
अर्जात दिलेली वरील प्रमाणे रहिवास पत्ता, कुटुंबातील एकुण अपत्यांची संख्या इ. व इतर माहिती खरी असुन याबाबत कोणतीही माहिती खोटी आढळुन आल्यास माझी कन्या भाग्यश्री योजनेअंर्तगत भरलेली रक्कम/ मिळालेले अनुदान वसुल करण्यास मी पात्र राहील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी (Documents):

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रेशनिंग कार्ड
सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
लाभार्थी मुलींचे आधार कार्ड

सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याची कार्य पध्दती
सदर योजनेंतर्गत, लाभासाठी मुलीच्या पालकांनी, मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधीत स्थानिक स्वराज्य
संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र–अ० किंवा -ब० मध्ये (जे लागू असेल ते) अर्ज सादर करावा.
अर्जासोबत उपरोक्त अटी व शर्ती नुसार नमूद दस्तऐवज सादर करण्यात यावेत. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज,
राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद,
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
अंगणवाडी सेविकेने संबंधीत लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा (गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत करावी)
सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.
अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी, सदर अर्जाची व प्रमाणत्रांची छाननी / तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण
क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ बालकांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
यांनी महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी.
महिला व बाल विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांनी योग्य ती छाननी करुन यादीस मान्यता देऊन बँकेस सादर करावी.
बालगृह/शिशुगृह किंवा महिला व बाल विकास विभागातंर्गतच्या इतर निवासी संस्थामधील अनाथ मुलींबाबत लाभ मिळण्यासाठी अर्ज
सादर करण्या आधी संबधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबधित संस्थानी प्राप्त करून घेऊन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

शासन निर्णय डाउनलोड – Download

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज डाउनलोड – Download

Leave a Comment