Maharashtra ration card list updates : महाराष्ट्रातील इच्छुक लाभार्थी ज्यांना महाराष्ट्र शिधापत्रिका यादी 2023 मध्ये त्यांचे नाव तपासायचे आहे , त्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करावा. सर्वप्रथम, अर्जदाराला अन्न विभागाच्या http://mahafood.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
रेशन कार्डवर किती धान्य मिळते ते Online कसे चेक करावे ?
सर्वप्रथम तुम्हाला mahafood.gov.in हे गुगल वर सर्च करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या समोर महा फूड हे गव्हर्मेंट चे पोर्टल उघडेल.
त्यावर ऑनलाइन रास्त भाव दुकाने या पर्यायावर क्लिक करायचे.
समोर एक नवीन पृष्ठ उघडेल त्यामध्ये AePDS- सर्व जिल्हे यावर क्लिक करायचे.
पुढे आणखी नवीन पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हाला RC Details New या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
येथे रेशन कार्ड यादीत नाव चेक करा
त्यानंतर एक RC Details असे एक टायटल असलेले नवीन पृष्ठ open होईल. त्याच्या खालीच तुम्हाला SRC नंबर जोकी तुमच्या रेशन कार्ड च्या पहिल्या पृष्ठावर वरच्या किंवा खालच्या कोपर्यात असतो तो 12 अंकी ARC नंबर त्या बॉक्स मध्ये भरावा.
SRC नंबर च्या शेजारी महिना आणि वर्ष तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्या महिन्यात मिळालेले Online राशन धान्य चेक करू शकता.
नंबर आणि वर्ष, महिना भरुन झाल्यास सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
रेशन कार्डचे प्रकार
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शिधापत्रिकेची तीन प्रकारात विभागणी केली आहे. लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही विभागणी करण्यात आली आहे.
बीपीएल रेशन कार्ड: दारिद्र्यरेषेखालील या सर्व लोकांना बीपीएल रेशन कार्ड दिले जाते. बीपीएल शिधापत्रिका मिळविण्यासाठी, तुमचे वार्षिक उत्पन्न ₹15000 ते ₹100000 दरम्यान असावे. हे शिधापत्रिका पिवळ्या रंगाचे आहे.
अंत्योदय शिधापत्रिका: अत्यंत गरीब लोकांना अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते. हे रेशन कार्ड भगव्या रंगाचे आहे. जे लोक कमवत नाहीत त्यांना हे रेशनकार्ड दिले जाते.
एपीएल रेशन कार्ड: हे रेशनकार्ड दारिद्र्यरेषेच्या वर आलेल्या सर्व लोकांना दिले जाते. APL शिधापत्रिका मिळविण्यासाठी, तुमचे वार्षिक उत्पन्न ₹ 100000 किंवा त्यापेक्षा कमी असावे. हे शिधापत्रिका पांढर्या रंगाचे आहे.