मिनी ट्रॅक्टर साठी सरकारकडून मिळणार तब्बल 90% टक्के अनुदान खात्यात जमा होणार

kisan tractor yojana 2023 मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान
शेतातील विविध कामासाठी शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करत असतात. सरकारे अश्या शेतकरी बांधवांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु केली आहे. आता गरजू शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लाभासाठी अशा आहेत अटी

बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
बचत गटातील ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.
याआधी यासंबंधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य याच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रुपये ३.५० लाख इतकी असेल.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत.
ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
Purpose of Mini Tractor Anudan Yojana Maharashtra
मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र राबविण्याचा उद्देश:-

या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावी.
त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र भाड्याने देऊ चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात.
त्याचप्रमाणे याअंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.
Required Document List
मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे

बँक पासबुक
बचत गटाचे घटना पत्र
बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी
बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र
आधार कार्ड, पॅन कार्ड
Mini Tractor Scheme Application Process
मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज प्रक्रिया

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या बचत गटांना अर्ज करायचा असेल त्यांनी लेखी अर्ज आणि त्या अर्जासोबत आवश्यक ती दर्शवलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा समाज कल्याण कार्यालय सहाय्यक आयुक्त परभणी यांच्याकडे जमा करायचा आहे.

How to apply for Mini Tractor Scheme
येथे करावे लागणार अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहे व कोणत्या अटी आहेत हे आपण जाणून घेतले.
या योजनेत ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात भेट द्या.
या योजनेचे अधिक माहिती हवी असल्यास शासनाच्या अधिकृत व्यवसाय भेट द्या.
संपर्क – संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment