10,000 हजार रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यादीत नाव तपासा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती

kanda anudan 2023 पहिल्या टप्प्यात कांदा अनुदानाचे दहा हजार होणार जमा
नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदानाची रक्कम ४३५ कोटींपेक्षा अधिक असल्याने टप्प्याटप्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, दहा हजारांचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कांदा अनुदानासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दहा हजाराचा पहिला हप्ता जमा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदानाची रक्कम ४३५ कोटींपेक्षा अधिक असल्याने टप्प्याटप्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, दहा हजारांचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

जिल्ह्यात कांद्याचे भाव पडल्याने फेब्रुवारी-मार्च महिन्यात शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी onion subsidy प्रस्ताव पाठविले होते. कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची शासकीय लेखा परीक्षकांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून यासाठी ४३५,६१,२३,५७८ अनुदान मंजूर देखील करण्यात आले आहे.

 

kanda anudan 2023 नाशिक जिल्ह्यातील अनुदानाची रक्कम मोठी असल्याने मंजूर होणाऱ्या निधीच्या विनियोगानुसार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ज्या जिल्ह्यांची मागणी १० कोटीपेक्षा जास्त आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी १० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाशिकला निदान पहिला हप्ता मिळणार आहे तर उर्वरित रक्कमदेखील टप्प्याटप्प्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

– १० कोटीपेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजारपर्यंत अनुदान जमा होईल.
– ज्या शेतकऱ्यांची १० हजारपर्यंतची देयके आहेत त्यांचे पूर्ण अनुदान जमा होईल. तर ज्या लाभार्थ्याचे देयक १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.
– कांदा अनुदान सरकारने जाहीर केले पण ते खात्यात जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या.

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकयांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटींपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे – दादा भुसे, पालकमंत्री

Leave a Comment