अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये बँक खात्यात जमा

Insurance Claims Survey: राज्यात जून ते ऑक्टोबर,2020 या कालावधीत विविध जिल्हयात अतवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 23.10.2020 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक 29.10.2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.यानुसार संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य कार्यकारी समितीच्या दि.03.11.2020 रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार संबंधित विभागीय आयुक्त यांना संदर्भाधीन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरीत करण्यात आला आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार रुपये बँक खात्यात जमा

 

विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या संदर्भाधीन क्र.५ च्या पत्रान्वये जून ते ऑक्टोबर, 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. Crop insurance big news

त्यानुसार विभागीय आयुक्त, नागपूर यांना अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Crop insurance big news राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत संदर्भाधीन १ ते ३ येथील शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या बाबी व दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक ४ ते ९ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, नागपूर यांनी संदर्भाधीन क्र.५ च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता रू.४९.९५ लक्ष (रूपये एकोण पन्नास लक्ष पंच्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

या आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत

Leave a Comment