Gas cylinder rate change : मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस अगोदर देशभरातील महिलांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या जवळ जवळ 200 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा नुकतीच केलेली आहे.Gas cylinder rate change
ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितल आहे त्यामुळे बुधवारपासून म्हणजेच उद्यापासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतलेला आहे
देशात जवळ जवळ 75 लाख भगिनींना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळणार असल्याचे ही सांगितले आहे.व त्यासाठी त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळणार आहे . संम्पूर्ण जगभरात गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, मात्र आपल्या भारतात त्याचा परिणाम कमी प्रमाणात दिसत आहे.
अनुराग ठाकुर पुढे असे म्हणाले की, यापूर्वी उज्ज्वला योजनेंतर्गत 200 रुपये अनुदान होते, तर आजपासून त्यावरती जवळपास 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की आता उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्याना 400 रुपये अनुदान मिळणार आहे. देशात जवळ जवळ 33 कोटी लोकांने गॅस सिलेंडर कनेक्शन घेतलेले आहेत.व आता आणखी जवळ जवळ 75 लाख नवीन गॅस कनेक्शन देशात दिले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 7680 कोटी अतिरिक्त खर्च सरकारच्या तिजोरीवर येणार आहे.
केंद्र सरकार उज्ज्वला सिलेंडरसाठी प्रत्येक कनेक्शनसाठी जवळपास 3600 रुपये सरकार खर्च करत असून आतापर्यंत सुमारे 9.60 लाख महिलांना देशात उज्ज्वला सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याला आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज सांगितलेलं आहे व परत यामध्ये आणखी जवळ जवळ 75 लाख नवीन महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ज्यावेळेस मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आलं होतं त्यावेळी देशात केवळ 14.5 कोटी लोकांनी गॅस कनेक्शन घेतलेलं होतं. पण आज रोजी देशातल्या सुमारे 33 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं आहे.
आज रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास 1100 रुपयांच्या वर असून मोदी सरकारच्या या घेतलेल्या आजच्या निर्णयामुळे उद्यापासून म्हणजे बुधवारपासून ती 900 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे असं बोल जात आहे.