सर्वसामान्य ग्राहकांना आवश्यक दिलासा मिळाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९% तर रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.केंद्र सरकार खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमतींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी लोकसभेत याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. किरकोळ किमतींवरील बचतीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकार सतत प्रयत्न करत आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय किमतीतील कपातीच्या बरोबरीने देशांतर्गत किमती निश्चित करण्यासाठी सरकार उद्योग नेते आणि संस्थांशी चर्चा करत आहे. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी केले आहे, त्यामुळेच हा फायदा झाला असंही ते म्हणाले.दरम्यान, परिष्कृत सूर्यफूल तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पामोलिन तेलाच्या किमती अनुक्रमे २९.०४ टक्के, १८.९८ टक्के आणि २५.४३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. अशी माहिती सुद्धा राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत दिली.