Claim survey update महाराष्ट्राच्या राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे याबाबतची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यातील 23
जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असल्याचे कृषी आयुक्तालय कडून सांगण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
Pik Vima 2023 Maharashtra :
मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेली महिनाभर कोणत्याही प्रकारचा पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यांचा
खरीप हंगाम हा वाया गेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशातच पिक विम्याचे अनुदान कधी मिळणार शेतकरी वारंवार चौकशा करत आहे परंतु आता शेतकऱ्यांना वाढीव पिक
विमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालय त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
कोणाला पिक विम्याचा लाभ मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास राज्यातील 528 मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसात खंड पडला होता यापैकी 231 मंडळांना तब्बल महिनाभर पाऊस पडला
नव्हता त्यामुळे ही 231 मंडळी आता पीक विम्यासाठी पात्र झाली आहेत. यामध्ये पुणे विभागातील देखील यांचा समावेश आहे. कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्याला पिक विमा मिळणार
याबद्दल माहिती पाहूया.
विभाग पुणे समाविष्ट असणारे जिल्हे आणि मंडळे –
पुणे जिल्ह्यातील मंडळांची संख्या 36
अहमदनगर जिल्ह्यातील मंडळांची संख्या 42
सोलापूर जिल्ह्यातील मंडळांची संख्या 29
विभाग लातूर समाविष्ट असलेले जिल्हे आणि मंडळे –
लातूर जिल्ह्यातील मंडळांची संख्या 22
धाराशिव जिल्ह्यातील मंडळांची संख्या 7
परभणी जिल्ह्यातील मंडळांची संख्या 3
विभाग कोल्हापूर समाविष्ट असलेले जिल्हे आणि मंडळे –
सातारा जिल्ह्यातील मंडळांची संख्या 16
सांगली जिल्ह्यातील मंडळांची संख्या 13
कोल्हापूर जिल्ह्यातील मंडळांची संख्या 01
विभाग छत्रपती संभाजीनगर समाविष्ट असलेले जिल्हे आणि मंडळे –
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंडळांची संख्या 13
जालना जिल्ह्यातील मंडळांची संख्या 07
बीड जिल्ह्यातील मंडळांची संख्या 05
विभाग नाशिक समाविष्ट असलेले जिल्हे आणि मंडळे –
नाशिक जिल्ह्यातील मंडळांची संख्या 15
जळगाव जिल्ह्यातील मंडळांची संख्या 10
अमरावती विभागातील समाविष्ट असलेले जिल्हे आणि मंडळे –
अकोला जिल्ह्यातील मंडळांची संख्या 09
बुलढाणा जिल्ह्यातील मंडळांची संख्या 02
अमरावती जिल्ह्यातील मंडळांची संख्या 01