कशी आहे योजना?
3 lakh interest loan : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत 3 टक्के व्याज सवलत 1 लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती. आता 1 लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक 2 टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
या शेतकऱ्यांना 3 लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार…
1 लाखाची मर्यादा 3 लाखापर्यंत वाढवली
यापूर्वी शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज उपल्बध करुन देण्यात येत होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने ही मर्यादा वाढवली आहे. आज मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 3 लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. crop loan
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज ० टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बिनव्याजी पीक कर्जाची ही सवलत पूर्वी केवळ १ लाख रूपयांपर्यंत होती. या निर्णयाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ होईल.
सन 2022-23 वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य रू.23200.00 लाख अर्थसंकल्पीय तरतूद असून त्यापैकी रू.4872.00 लाख एवढ्या निधीचे वितरण वाचा क्रमांक 5 येथील शासन निर्णयांनव्ये आणि रु.3248.00 लाख निधीचे वितरण वाचा क्रमांक 7 येथील शासन निर्णयांनव्ये आले आहे.आता रुपये. 1624.00 लाख ( रूपये सोळा कोटी चौवीस लाख फक्त )एवढी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी लाभ घेऊ शकता.
या शेतकऱ्यांना 3 लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार…