3 lakh interest free loan : आता राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
crop loan राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पीककर्ज 0% व्याजदर बँका कोणत्या आहेत
डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुद्दत कर्जास सदरची योजना लागू नाही.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व बँकामार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडित व्याज सवलत देण्यात येत आहे.
दिनांक 03/12 /2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार रुपये 1 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 3% व त्यापुढील रुपये 3 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 1% दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने दिनांक 11/06/ 2019 रोजीच्या शासन निर्णय 3 लाख मर्यादेपर्यंत अल्प मुद्दत पीक कर्ज घेऊन त्याची मुद्दतीस परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना 0% व्याज दराने उपलब्ध होणार आहे .